मुंबई - तौत्के चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणा-या ७ पैकी ६ तलाव क्षेत्रांत १७ मे ते २० मे २०२१ या साधारणपणे ४ दिवसांच्या कालावधी दरम्यान काही प्रमाणात पाऊस झाला आहे. यापैकी सर्वाधिक २१० मिली मीटर एवढा पाऊस हा विहार तलाव क्षेत्रात झाला आहे.
महापालिका क्षेत्राला करण्यात येणा-या दररोजच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन व त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते. पालिका क्षेत्राला दररोज तब्बल ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पाणीपुरवठा ७ तलावांमधील जलसाठ्यातून केला जातो. या ७ पैकी ५ तलाव हे महापालिकेच्या अखत्यारित आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रातील तुळशी व विहार या २ तलावांसह मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा या मनपा क्षेत्राबाहेरील तलावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त उर्वरित अप्पर वैतरणा व भातसा हे २ तलाव (धरण) राज्य शासनाच्या अखत्यारित आहेत.
तौक्ती वादळाच्या प्रभावामुळे तलावक्षेत्रातही चांगला पाऊस पडला. चार दिवसांत सर्वाधिक २१० मिली मीटर एवढा पाऊस हा विहार तलाव क्षेत्रात झाला आहे. या खालोखाल तुळशी तलाव क्षेत्रात १७८ मिली मीटर, मोडक सागर १०२ मिली मीटर, ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ ६२ मिली मीटर, तानसा ५९ मिली मीटर, भातसा २९ मिली मीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर, अप्पर वैतरणा तलाव क्षेत्रामध्ये मात्र पाऊस पडलेला नाही. चार दिवसात पडलेल्या पावसामुळे तलाव साठ्यात काही प्रमाणात भर पडली असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.

No comments:
Post a Comment