मुंबई - पश्चिम उपनगरातील नालेसफाईचे जवळपास ७६ टक्के काम पूर्ण होत आल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी अधिक गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. त्यांनी आज नाळेसफाईचा पाहणी दौरा केला.
पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासमवेत पाहणी केली. .
याप्रसंगी आमदार विलास पोतनीस , सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प ) पी. वेलरासू, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती अध्यक्ष उपनगरे. स्वप्निल टेंबवलकर , नगरसेविका रोहिणी कांबळे, शीतल म्हात्रे, सुजाता पाटेकर, उपायुक्त पराग मसुरकर, उपायुक्त विश्वास शंकरवार, उपायुक्त अनंत कदम, सहाय्यक आयुक्त अलका ससाणे, सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे आदी उपस्थित होते.
वाकोला नदी, विभागातील एसएनडीटी नाला, ओशिवरा लींक रोडवरील ओशिवरा नदी, गोरेगाव पश्चिम लिंक रोडवरील शास्त्री नगर नाला, लिंक रोडवरील पोईसर नदी बोरिवली पश्चिमच्या राजेंद्र नगर नाला, दहिसर (पश्चिम ) मधील दहिसर नदीची पाहणी महापौरांनी केली.
यावेंकी महापौर म्हणाल्या की, गेल्या २२ फेब्रुवारी पासून नालेसफाईच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा नालेसफाईच्या कामांमध्ये कुठल्याही प्रकारे खंड न पडता नालेसफाईचे काम जोरात सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईकर नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये, यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दोन ते तीन दिवस पाण्याचा निचरा होत नव्हता, सद्यस्थितीत उदंचन केंद्राच्या कामामुळे पाण्याचा निचरा हा दोन ते तीन तासात होत असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच दहिसर येथील दहिसर नदीवर पुलाच्या कामासाठी बांधण्यात आलेली बँड वॉल काढून टाकण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. ज्यामुळे दहिसर गावठाणचा परिसर जलमय होणार नाही, यादृष्टीने काम पूर्ण करण्याचे निर्देशही महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment