मुंबई - मुंबईत २४ तासांत ३०३९ रुग्ण आढळले असून ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभऱात ४०५२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना चाचण्या ३५,२२४ करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या घटते आहे. गुरुवारी ३०५६ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी ही संख्या आणखी घटून ३०३९ रुग्णांची नोंद झाली आहे.
आतापर्यंत रुग्णांची संख्या ६,७१,३९४ वर पोहचली आहे. यातील ६,०६,४३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण १३,६८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४९,४९९ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९० टक्केवर गेला आहे. रुग्ण दुपटीचा दर १३८ दिवसांवर पोहचला आहे.
No comments:
Post a Comment