मुंबई : हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मान्सूनचा पाऊस अंदमान-निकोबार बेटावर दाखल झाला असून शुक्रवारी तेथे मान्सूनच्या सरी बरसल्या.
नैऋत्य मोसमी वारे हे २१ मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर दाखल होतील, असे हवामान विभागाने सांगितले होते. त्यानुसार मान्सूनने अंदमान – निकोबार बेटांवर प्रवेश केला आहे.
यंदा मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल, तर १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल.
No comments:
Post a Comment