अभिनेत्री कंगनाचं ट्विटर अकाउंट सस्पेण्ड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2021

अभिनेत्री कंगनाचं ट्विटर अकाउंट सस्पेण्ड



मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत मागील दोन दिवसांपासून ट्विटरवर अनेक आक्षेपार्ह ट्वीट करत होती. पश्चिम बंगाल येथे पार पडलेल्या मतदानात ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्यानंतर कंगनाने अनेक आक्षेपार्ह ट्वीट केले होते. अनेक युझर्सनी तिच्या अकाउंट विरुद्ध कारवाई करण्याची मागणीही केली होती. त्यानंतर ट्विटरकडून कंगनाचं अकाउंट सस्पेण्ड करण्यात आलं आहे.

कंगना रणौत मागील काही दिवसांपासून ट्वीटमुळे सोशल मीडियावर चर्चेत होती. पश्चिम बंगाल राज्यात झालेल्या मतदानात तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ममता बॅनर्जी यांचा विजय झाला आणि बीजेपीला हार पत्करावी लागली. त्यानंतर कंगनाने अनेक आक्षेपार्ह ट्वीट करत ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये कंगना ममता यांना ताडका राक्षसी म्हणाली होती. तिच्या या ट्वीटमुळे अनेकांनी तिचं अकाउंट रिपोर्ट केलं होतं. तिच्या या ट्वीटना युझर्स हिंसाचाराला प्रोत्साहन देणारं म्हणत होते. त्यामुळे ट्विटरने कारवाई करत कंगनाचं अकाउंट बंद केलं आहे.

यापूर्वी आणखी एक ट्वीट करत कंगनाने ममता यांची तुलना रावणाशी केली होती. तर बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांसाठी कंगनाने तृणमूल काँग्रेस पक्षाचे सदस्य जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे या हा हिंसाचार थांबवण्यासाठी तिने पंतप्रधान मोदी यांना २००० सालचं उग्र रूप दाखवण्याची विनंती केली होती. त्यावरून युझर्सनी याचा संबंध २००० साली झालेल्या गुजरात दंग्यांशी जोडत कंगना हिंसाचारासाठी अनुकूल वातावरण तयार करत असल्याचं म्हटलं. या सर्व आक्षेपार्ह ट्वीटमुळे कंगनाचं अकाउंट सस्पेन्ड करण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad