"अदर पूनावाला यांनी 'टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीबाबतचं सत्य संपूर्ण देशाला जाणून घ्यायचं आहे. मी खरं बोललो तर माझं शीर कापलं जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याबाबतचं सत्य देशासमोर यायला हवं," असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 'पूनावाला यांनी मुलाखतीतून केलेले आरोप गंभीर आहेत. ते वाचल्यानंतर मला धक्का बसला. म्हणून या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. पूनावाला यांनी लसीचं उत्पादन पुण्यातून लंडन हलवण्याचा निर्णय का घेतला? याबाबतही तपास होणं गरजेचं आहे,' अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे
दरम्यान, देशभरात करोना व्हायरसनं धुमाकूळ घातल्याने लसीकरणासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. लसींच्या पुरवठ्यावरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार आमने-सामने येत आहेत. तसंच आपल्या राज्याला अधिकाधिक लसी मिळाव्यात यासाठी सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर अदर पूनावाला यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नवं वादंग निर्माण झालं.
पूनावाला नेमकं काय म्हणाले? -
'द टाइम्स' या लंडनमधील वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अदर पूनावाला यांनी धमकीच्या फोन कॉल्सचा उल्लेख केला आहे. कोव्हीशील्ड तातडीने उपलब्ध व्हावी; यासाठी आपल्याला धमक्यांसारखे फोन येत असल्याचा दावा पूनावाला यांनी या मुलाखतीत केला आहे. सीरमकडून भारतीयांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. कोव्हीशील्डला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे असे आक्रमक फोन कॉल्स गंभीर आहेत. प्रत्येकाला लस तातडीने हवी आहे. मात्र त्यांना हे कळत नाही तर इतर कोणी आपल्याही आधी त्यांना लस पुरवू शकतो का, असंही अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment