नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढत आहेत. काल देशभरात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण बाधितांचा आकडा 2 कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे 2 कोटीहून अधिक कोरोना रुग्ण आढळ्याने भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे.
देशभरात 3 मार्च 2020 पासून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. काल देशभरात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले आहेत. साधारण 197 दिवसांमध्ये 15 सप्टेंबर 2020 पर्यंत हा कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर 94 दिवसांपर्यंत 18 डिसेंबरमध्ये कोरोना रुग्णाचा आकडा 1 कोटीपर्यंत पोहोचला. यानंतर 121 दिवसात 50 लाख रुग्ण समोर आले आहेत आणि 15 दिवसांत 50 लाख बाधित आढळले आहेत.
देशात कोरोना रुग्णवाढीचा अंदाज -
आयआयटी (हैदराबाद) चे प्राध्यापक आणि कोरोना सुपर मॉडल समितीचे प्रमुख डॉ. विद्यासागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशात कोरोना रुग्ण वाढत आहे. गेल्या 13 मार्चपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत होती. पण ती किती पटीने वाढते याचा अंदाज लावण्यासाठी आमच्याकडे पुरेसा डेटा नव्हता. त्यानंतर 2 एप्रिलला पुन्हा एकदा औपचारिक भविष्यवाणी केली गेली. यात 15 ते 22 मे दरम्यान दररोज सुमारे 1.2 लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
डॉ. विद्यासागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारला यापूर्वी 15 ते 22 मे दरम्यान दररोज सुमारे 1.2 लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळतील, याची माहिती दिली होती. तसेच कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळले, अशीही माहिती यात देण्यात आली होती.
सद्यस्थितीत देशात साडेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. आयआयटी (कानपूर) ने दिलेल्या सूचनेनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत येत्या 8 मे पर्यंत कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर 14 ते 18 मे दरम्यान देशात 38 ते 44 लाख सक्रीय रुग्ण असल्याचा अंदाज आहे.
केंद्राकडे अनेक सवाल -
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल जर केंद्र सरकारला माहिती होते, तर मग त्यांनी दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी प्रयत्न का केले नाही? कोणत्याही उपाययोजनांबद्दलची माहिती का दिली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी -
भारतातील एकूण कोरोनाग्रस्त : 1 कोटी 99 लाख 25 हजार 604
कोरोना उपचारानंतर बरे झालेले एकूण रुग्ण : 1 कोटी 62 लाख 93 हजार 003
देशातील एकूण कोरोनाबळी : 2 लाख 18 हजार 959
देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्ण : 34 लाख 13 हजार 642
No comments:
Post a Comment