भारताची परिस्थिती विदारक जागतिक आरोग्य संघटनेची माहिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 May 2021

भारताची परिस्थिती विदारक जागतिक आरोग्य संघटनेची माहिती



संयुक्त राष्ट्रे : भारतात अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे. भारतामधील परिस्थिती गंभीर आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी भारतातील परिस्थिती विदारक असल्याचे सांगितले. भारतात कोरोना संकट गहिरे होत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून हे वक्तव्य आले आहे. जागतिक आरोग्य संघटना जे शक्य आहे ते सर्व करत आहे. महत्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे, अशी माहिती टेड्रोस यांनी दिली आहे. कोरोनाशी सामना करताना आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून 2600 तज्ञ भारतात पाठवल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad