मुंबई - मुंबईत झपाट्याने वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या फरकाने घटली आहे. विशेष म्हणजे रोज आढळणाºया रुग्णांपेक्षा बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिलासादायक चित्र आहे. रोज 8 ते 11 हजारांवर पोहचलेली रुग्णसंख्या आता सतराशे ते दोन हजारापर्यंत खाली आली आहे. तर मागील १५ दिवसांत 85 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
मुंबईत २६ एप्रिल ते ११ मे दरम्यान नवीन रुग्णांची संख्या ४८,४५९ इतकी नोंदविण्यात आली. या कालावधीत ८५,३६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र या कालावधीत शहरातील कोरोनाने मृतांची संख्याही वाढली होती. आता दैनंदिन मृतांची संख्याही नियंत्रणात आली आहे. पालिकेच्या नोंदीनुसार, ११ मे रोजी नवीन रुग्णांची संख्या १,७१७ आणि मृतांची संख्या ५१ अशी होती. तर यापूर्वी २६ एप्रिल रोजी दैनंदिन रुग्ण संख्या ३,८७६ आणि मृतांची संख्या ७० वर होती. सध्या रुग्णसंख्या व मृतांची संख्या नियंत्रणात आहे. पालिकेने राबवलेल्या प्रभावी उपाययोजना आणि लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणी कमी झालेली गर्दी यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment