मुंबई: देशात एकीकडे करोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे आज देशाच्या ५ राज्यातील निवडणूकांचा निकाल लागणार आहे. अंतिम विजय कोणाचा होईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे पण याबाबत सोशल मीडियावर मात्र बरंच काही बोललं जात आहे. अभिनेत्री कंगना रणौतनं ट्वीट केलं होतं त्यानंतर आता अभिनेता प्रकाश राज यांनीही याबाबत ट्वीट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.
प्रकाश राज यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेत्यांनो, नागरिकांनी स्पष्टपणे म्हटले आहे. द्वेष आणि व्हायरस पसरवणं आता थांबवा. दाढी करा आणि तुम्ही ज्या काही चुका केल्यात त्या निस्तरायला आता सुरुवात करा. अखेर जीव महत्त्वाचा आहे' प्रकाश राज यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सध्या पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्यं आणि पाँडिचेरी केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. काही वेळानंतर या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. पण या ५ राज्यांमध्ये सर्वाधिक चुरस ही पश्चिम बंगालमध्ये पाहयला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस सत्तेत राहणार की भाजपला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
तसं पाहायला गेलं तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रसची सत्ता कायम राहिलं असं वाटत आहे. देशभरात एकीकडे करोनाचं मोठं संकट सुरू असताना राजकीय वर्तुळात आज या निकालांची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment