मुंबईत उद्या पासून कडक निर्बंध लावण्याचे संकेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 April 2021

मुंबईत उद्या पासून कडक निर्बंध लावण्याचे संकेत

मुंबई - मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसात ५ ते ६ हजार रुग्ण दिवसाला आढळून येत आहेत. यात वाढ होऊन दिवसाला १० हजार ते २१ हजार रुग्ण दिवसाला आढळून येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत सध्या नाईट कर्फ्यू लावण्यात आला असला तरी दिवसा गर्दी होत आहे. मुंबई डेंजर झोनमध्ये आहे. अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईत उद्या पासून कडक निर्बंध लावण्यात येतील अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी राज्य सरकार मार्गदर्शक सूचना जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर बोलत होत्या. यावेळी बोलताना महापौरांनी गर्दी कर्मी करण्यासाठी कडक निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत. 

मुंबईत कडक निर्बंध लावले जाणार असून त्यानुसार हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थितीची कडक अंमलबजावणी केली जाईल. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वयोवृद्ध आणि लहान मुले मोठ्या संख्येने जातात. त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे बंद केली जातील. थिएटर, मॉल बंद केले जातील. ट्रेनमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सामान्य प्रवाशांना ट्रेनमधील प्रवास बंद करून अत्यावश्यक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा दिली जाईल असे महापौरांनी सांगितले. कार्यलयांमध्ये दोन शिफ्ट कण्यावर आणि ५० टक्के उपस्थितीवर भर दिला जाईल. दुकानात जास्त गर्दी होत असेल तर सर्वाना त्रास होऊ शकतो यामुळे दुकाने एक दिवस सोडून उघडली जातील असे महापौरांनी सांगितले. 

संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला तर ३१ मार्चला ३ हजार ९०० बेड उपलब्ध आहेत. ३२४ आयसीयू तर १७० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. रुग्णसंख्या वाढत आहे त्याप्रमाणे धोका देखील वाढत आहे. त्यासाठी १६ हजाराहून २५ हजार बेड उपलब्ध  करून दिले जात आहेत. पालिकेची बेड वाढवण्याची तयारी सुरु आहे. आमची तयारी फुकट गेली तरी चालेल पण नागरिकांनी कोरोनाची लागण होऊ नये असे महापौर म्हणाल्या. मुंबई आजही डेंजर झोनमध्ये आहे. इमारती मधून कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे. झोपडपट्टी आणि चाळीत कोरोनाचा प्रसार कमी असल्याचे महापौरांनी संगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad