मुंबई - इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ही अधिक आहे. ही वाढणारी आकडेवारी पाहता प्रशासनावर ताण निर्माण होत आहे हे नाकारता येणार नाही. राज्यामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आला आहे. याची संसर्ग होण्याची क्षमता आधीपेक्षा जास्त आहेे अशी माहिती टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी दिली.
कोरोना वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जनसंख्या. राज्यात अनेक शहरे अशी आहेत जिथे लोकसंख्या दाटीवाटीने राहते. अनेक शहर ही प्राईम इंडस्ट्रियल कॅपिटल आहेत. एमआयडीसी, उद्योग धंदे आहेत त्यामुळे अनेक लोक एकत्र संपर्कात येऊन काम करतात. त्यामुळे संसर्ग पसरायला व्हायरसला संधी मिळते. त्यात मास्क न वापरण्याची लोकांची वृत्ती भर घालते. तसेच वर्कर फ्रॉम होम असताना लोक घराबाहेर पडतात. सोशल, फायनान्सिएल, प्रोफेशनल कामासाठी लोक बाहेर पडतात. त्याच बरोबर राज्यात कोरोनाचे दोन स्ट्रेन आढळून आले आहेत. यांची संसर्ग होण्याची क्षमता जास्त आहे. या सगळ्यांची परिणीती राज्यात कोरोना वाढण्यात झाली आहे.
डॉ. संजय ओक सांगतात की, "टास्क फोर्सने अनेक उपाययोजना सुचवलेल्या आहेत. आपल्या उपचार पद्धती अपडेट करून त्याचा प्रोटोकॉल आरोग्य विभागाला दिलेला आहे की, जेणेकरून तो राज्यभर प्रस्तुत व्हावा. त्यात प्रोटोकॉलमध्ये औषधांच्या सूची आहेत, कोणतं औषध आजाराच्या कितव्या दिवशी वापरायचं यांचे निर्देश आहेेत. वेंटलेटर कधी वापरायचा? हायफ्लो लेझल कॅनोलाचा वापर कधी करायचा. लेझल ऑक्सिजन किती लिमीटपर्यंत न्यायचा, रुग्णाला पालथ्या स्वरुपात कधी आणि किती तास झोपवायचे. कोणती औषधे वापरायची नाहीत, याच्या सूचना देखील केल्या आहेत. प्लाझमाचा वापर क्रिटीकल कंडीशनमध्ये किती लवकर करावा, याचे निर्देश दिले आहेत. होमक्वारंटाईन स्ट्रिकली कसे व्हावे, याच्या सूचना केल्या आहेत. तसेच लसीकरण विद्युतवेगाने कसे करता येईल, याचाही ओहापोह टास्क फोर्सने केल्याचे संजय ओक सांगतात.
10 ते 14 वयोगटातील मुलांमध्ये कोरोना वाढण्याचे प्रमाण दिसून येत आहे. याचा अभ्यास करायला हवा. काही बाबतीत मध्ये मोठ्या व्यक्तींची औषध लहान मुलांमध्ये वापरण्यात आली आहेत. लहान मुलांच्या बाबतीत ही या औषधांची उपाययोजना करता येईल. काही ट्रायल्स करणे गरजेचे आहे. इंग्लंड सारख्या देशात लहान मुलांमध्ये लसीकरणाच्या ट्रायल सुरू आहेत. मॉडर्ना आणि फायझर या दोन्ही लसी लहान मुलांमध्ये सेफ असल्याचे इंग्लंडमध्ये दिसून आले आहे. आपल्यालाही त्यादृष्टीने हळूहळू मार्गक्रमणा करावी लागेल, असे डॉ. ओक यांनी म्हटलंय.
No comments:
Post a Comment