अग्निशमन दलाची वाटचाल खाजगीकरणाकडे, कंत्राटी पद्धतीने वाहकांची भरती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 February 2021

अग्निशमन दलाची वाटचाल खाजगीकरणाकडे, कंत्राटी पद्धतीने वाहकांची भरती



मुंबई - आपत्कालीन स्थिती मदतीला धावणाऱ्या मुंबई मनपा अग्निशमन दलाची वाटचाल खासगीकरणाकडे सुरु झाली आहे. त्यानुसार जीप, कार आदी वाहने चालविण्यासाठी खासगी वाहकांची भरती केली जाणार आहे. आगामी स्थायी समितीत यावरुन वाद रंगणार आहे.

मुंबई अग्निशमन दलात यंत्रचालक संवर्गाची ६६५ पदे असून यापैकी १५८ पदे रिक्त आहेत. आपत्कालीन परिस्थितीत द पंप ऑपरेट करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करते. त्यामुळे प्रक्षिशित यंत्रचालकांना जीप व कार चालवण्यास तैनात केल्यास आगीवर नियंत्रण मिळवणे कठिण होते. काळबादेवी येथे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार अग्निशमन दलातील रुग्णवाहिका व जीप व कार चालवण्यासाठी खाजगी वाहक भरती केली जाणार आहे.

पालिकेने रिक्त जागा भरण्याऐवजी खाजगी कंत्राटदाराकडून नोकर भरती करणार आहे. मनपा अग्निशमन दलात एकूण ६६५ यंत्राचालक संवर्गाची पदे आहेत. परंतु, अनुभवी चालक मिळत नसल्याने दोन वर्षासाठी ५४ कंत्राटी चालक ८४ वाहनचालकांकरिता घेतले जाणार आहेत. ५ कोटी ९७ लाख ८७ हजार रुपये यावर खर्च केला जाणार आहे. मे. के एच एफ एम हॉस्पिलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसला अटी आणि शर्तीवर हे काम दिले जाणार आहे. अग्निशमन पदावर काम करणाऱ्या उमेदवाराकडे पाच वर्षाचा अनुभव आणि १ वर्ष अवजड वाहने चालविण्याचा परवाना असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

अशी असेल अट
उंची - १६५ सें.मी
वजन - ५० किलो
दृष्टी - चष्मा नसावा
वयोमर्यादा - २१ ते ४५ वर्ष
शैक्षणिक अर्हता - १० वी उत्तीर्ण

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad