मुंबईत दिवसभरात ४६१ रुग्णांची नोंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 February 2021

मुंबईत दिवसभरात ४६१ रुग्णांची नोंद



मुंबई - मुंबईत आटोक्यात आलेली कोरोना रुग्णांची संख्या मागील पाच ते सहा दिवसांपासून वाढते आहे. मात्र रविवारपर्यंत वाढलेली रुग्णसंख्या सोमवारी व मंगळवारी काहीअंशी घटल्याने दिलासा मिळाला आहे. १५ दिवसांपूर्वी रोजची ३३४ वर घसरलेली रुग्णांची आकडेवारी दुपटीने म्हणजे सहाशे पर्यंत पोहचली होती, त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र सोमवारी ही आकडेवारी घटून ४९३ रुग्णांची तर दुस-या दिवशी मंगळवारीही आकडेवारी आणखी घटून ४६१ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून खबरदारी घ्या असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
 
मुंबईत डिसेंबरनंतर रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. २ हजार ते अडीच हजारपर्यंत रोज आढळणारे रुग्ण कमी झाले. जानेवारीत ही संख्या आणखी कमी झाली. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत लोकल सुरु करण्यात आली. मात्र १० दिवसांनंतर रुग्णसंख्या काहीशी वाढू लागली आहे. २ फेब्रुवारीला मुंबईत ३३४ पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या रविवारपर्यंत चारशे, साडेचारशे, पाचशे तर पावणे सहाशेपर्यंत नोंदवली गेली.

८ फेब्रुवारीला ३९९, ९ फेब्रुवारीला ३७५ असणारी रुग्णसंख्या १० फेब्रुवारीला ५५८ तर ११ फेब्रुवारीला ५१० नोंदवली गेली. ही वाढ १४ फेब्रुवारीला वाढत जाऊन ६४५ इतकी नोंदवली गेली. म्हणजेच तीन दिवसांत १३५ ची वाढ झाली झाल्याने मुंबईकरांच्या चिंता वाढली. रुग्णवाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आणखी सतर्क झाली असून दैनंदिन चाचण्यांची संख्या १८ हजारपर्यंत वाढवण्यात आली. सोमवारी मात्र वाढलेली रुग्णसंख्या काही प्रमाणात घटली. दिवसभरात ४६१ रग्णांची नोंद झाली. तर दुस-या दिवशी मंगळवारीही या संख्येत घट होऊन ४६१ रुग्ण सापडले. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत ३१५०३० रुग्णांची संख्या झाली असली तरी यातील तब्बल २९७१०१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ११४२३ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता ५६४९ अॅक्टीव रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केरळमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. परदेशातून आलेल्या प्रवासी कोरोना निगेटिव्ह असले तरी सात दिवसांचे हॉटेलमध्ये सक्तीचे क्वारेंटाइन केले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
....
- मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९४ टक्के
- ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोविड वाढीचा दर - ०.१६ टक्के
- रुग्ण दुपटीचा कालावधी - ४४५ दिवसांवर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad