मुंबई दि. १६ जानेवारी - देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानुसार मुंबईतही दिवसाला चार हजार लाभार्थ्यांना लसीकरणाचे उद्धिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात १ हजार ९२६ जणांनीच लस घेतल्याचे समोर आले आहे. कोवीन अॅपच्या ढिसाळ कारभारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क न झाल्याने तसेच लसीबाबत भीती असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याची दिसून येत आहे.
लसीकरण -
परळ येथील केईएम रुग्णालयात २४३, सायन येथील टिळक रुग्णालयात १८८, नायर रुग्णालयात १९०, विलेपार्लेतील कूपर रुग्णालयात २६२, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात १४९, सांताक्रूझमधील व्ही.एन. देसाई रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी ८०, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालयात २८९, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात २६६ आणि बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात २२० तर जे.जे. रुग्णालयात ३९ जणांना लस दिल्याची माहिती, पालिका प्रशासनाने दिली.
अॅपमधील तांत्रिक अडचणी -
केंद्राच्या कोविन अॅपवर मुंबई महापालिकेच्या आरोग्य कर्मचारी-फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण १ लाख ३० हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली. लसीकरणापूर्वी नोंदणीकृत लाभार्थ्यांना मॅसेज पाठवले जाणार होते. पण, को- विन अॅपवर तांत्रिक अडचण आल्याने नोंदणीकृत लाभार्थ्यांना मॅसेजच गेले नाहीत. प्रशासनाची यामुळे धावपळ उडाली. लसीकरणाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना, महापालिकेने संबंधितांशी कॉलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मॅसेज देखील पाठवले. पण, वेळेत मॅसेज न मिळाल्याने लाभार्थी वंचित राहीले आहेत. तसेच अनेकांनी भितीमुळे लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.

लसीकरणाचे पहिले लाभार्थी -
परळ मधील केईएम रुग्णालयात उप अधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर, सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, नायर रुग्णालयात अधिष्ठाता तथा महानगरपालिका रुग्णालय संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. रमेश भारमल, कूपर रुग्णालयात राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कारंथ, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पी/उत्तर विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॉ. ऋजूता बारस्कर आणि बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात आहारतज्ज्ञ मधुरा पाटील यांनी सर्वप्रथम लस घेतली.
आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीती -
जगभरात लस घेताना लाभार्थीना दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. लस किती सुरक्षित याची भीती अनेकांना आहे. त्यातच आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. लस घेतल्यावर आपल्याला काही झाले तर अशी भीती असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बोलून दाखवली आहे. तर काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपण कोरोना दरम्यान काम केले आहे. त्यावेळी आम्हाला काही झाले नाही. आता तर कोरोना आटोक्यात आला आहे. आमच्यात रोग प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे. मग आम्हाला लस घेण्याची गरज काय असे आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
९ केंद्रावर ४० बूथ -
मनपाच्या ९ लसीकरण केंद्रांवर ४० लसीकरण बूथ कार्यान्वित केले होते. या केंद्रांवर दिवसभरात ४ हजार लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष पालिकेने ठेवले आहे. तर राज्य शासनाच्या वतीने जे. जे. रुग्णालय हे एक केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड १९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचे सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत.
वेट अॅण्ड वॉच -
९ वाजता लसीकरणाला सुरुवात होणार होती. पण, उद्घाटनामुळे १२ नंतर लसीकरणाला सुरुवात झाली. दोन ते तीन तास वाया गेले. लसीकरणाला उपस्थित राहण्याचे मॅसेज लाभार्थीना उशीरा गेले. वॉर्डमार्फत मॅसेज पाठविण्याचे प्रयत्न केले. पण, सुट्टी असल्यामुळे लोक घराबाहेर पडली नाहीत. शिवाय, वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेमुळे लसीकरणाची संख्या कमी झाल्याची माहिती, महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
No comments:
Post a Comment