मुंबई - कोरोना लसीकरण धडाक्यात सुरु झाले असून मुंबईत शुक्रवारी झालेल्या लसीकरणाचा टक्का वाढला आहे. दिवसभरात ९२ टक्के लसीकरण झाले. एकूण १० केंद्रावर झालेल्या लसीकरणात एकूण ३५३९ लाभार्थ्यांनी लस टोचून घेतली.देशभरात शनिवारी, १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी अॅपमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने फक्त १ हजार ९२६ लाभार्थ्यांनाच लसीचा डोस टोचण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांच्या स्थगितीनंतर मंगळवार, १९ जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यावेळी ५० व ५२ टक्के लसीकरणाची नोंद झाली. शुक्रवारी मात्र लसीकरणाचा टक्का चांगलाच वाढून ९२ टक्केवर पोहचला आहे. केईमध्ये सर्वाधिक ६८५ जणांनी लस टोचून घेतली.
...
केंद्रनिहाय झालेले लसीकरण -
केईएम - ६८५
सायन रुग्णालय - ३०१
कूपर रुग्णालय - ३६८
नायर रुग्णालय - ३७८
व्ही. एन. देसाई रुग्णालय - ७२
शताब्दी रुग्णालय - ५७२
राजावाडी रुग्णालय - ५१७
जम्बो कोविड रुगणालय - ३५०
भाभा रुग्णालय - २७१
जे. जे. रुग्णलय - २५
No comments:
Post a Comment