मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करोना लसीकरणा संदर्भात एक मोठी माहिती देण्यात आली आहे. लसींना मंजुरी मिळाल्याच्या दहा दिवसांमध्ये प्रत्यक्ष लसीकरणास सुरूवात होऊ शकते. असं आरोग्य मंत्रालयाने पत्रकारपरिषद घेत सांगितलं आहे. डीसीजीआयने ३ जानेवारी रोजी लसींना मंजुरी दिली होती, त्यामुळे आता १३ ते १४ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसणार आहे. दहा दिवसांमध्ये लसीकरण सुरू करण्यास आम्ही सज्ज आहोत, आता अंतिम निर्णय सरकारला घ्यायचा आहे, असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती देताना सांगितले, सरकार १० दिवसांच्या आतमध्ये करोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात करण्यास तयार आहे. करोना वॅक्सीनला मंजुरी मिळालेली असल्याने दहा दिवासांच्या आत प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रम सुरू केला जाऊ शकतो.
भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिलेली आहे.
जगासोबत तुलना करायची झाली तर दहा लाख लोकसंख्येमागे सर्वांत कमी रुग्ण आपल्या देशात आढळत आहेत. आपल्याकडे आढळत आहेत. आपल्याकडे प्रमाण ७ हजार ५०४ केसेस इतकं आहे. अनेक देश असे आहेत, जिथं २२ हजार, ३५ हजार, ४० हजार एवढच नाही तर ६० हजारापेक्षाही जास्त केसेस आढळत आहेत.
मृत्यू दराबाबत बोलायचं झालं तर भारतात १०८ मृत्यू हे दहा लाख लोकसंख्येमागे होत आहेत. तर, अन्य देशांमध्ये १२०० पर्यंत मृत्यू होत आहेत.अॅक्टिव्ह केसेस आपल्याकडे दहा लाख लोकसंख्येमागे १६७ आहे. तर, यूएसएमध्ये २४ हजारांहून अधिक आहे. ईटलीमध्ये ९ हजाराहून अधिक आहेत.
No comments:
Post a Comment