थोर व्यक्तींच्या सरकारी यादीत प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2021

थोर व्यक्तींच्या सरकारी यादीत प्रबोधनकार, बाळासाहेब ठाकरे



मुंबई - राज्य सरकारतर्फे जयंती, पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याच्या राष्ट्र पुरूष, थोर व्यक्तींच्या यादीत प्रबोधकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही आता समावेश करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने या यादीत बदल केल्याने आता अशा दिवसांची यादी ३७ वरून ४१ झाली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर २०२१ वर्षासाठीची ही यादी १५ डिसेंबर २०२० रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये ३७ दिवसांचा समावेश होता. या यादीतील व्यक्तींच्या जयंती, पुण्यातिथी निमित्त त्यांना अभिवादन करणे, इतर दिवस त्या सूचनाप्रमाणे साजरे करणे, अशा सूचना सर्व सरकारी कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. आता १४ जानेवारी २०२१ रोजी यासंबंधीची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये चार नवीन नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, १६ फेब्रुवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, १७ सप्टेंबरला केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि २७ डिसेंबरला डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम समाविष्ठ करण्यात आला आहे. बाकीचे दिवस पूर्वीच्या यादीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत.

मंत्रालय, सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयांत या दिवशी संबंधित थोर व्यक्तींना अभिवादन करायचे आहे. त्यासाठी त्यांची प्रतिमा उपलब्ध करून सरकारी नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad