हॉटेलचे शुल्क न परवडणाऱ्या प्रवाशांना मोफत क्वारंटाइन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2021

हॉटेलचे शुल्क न परवडणाऱ्या प्रवाशांना मोफत क्वारंटाइन



मुंबई - नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, २१ डिसेंबरपासून परदेशातून मुंबईत येणाऱ्या ज्या प्रवाशांना हॉटेल क्वारंटाइनचे भाडे परवडत नाही अशा प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेने भायखळ्याच्या कोरोना सेंटरमध्ये मोफत राहण्या-जेवण्याची व्यवस्था केली असून त्याची कोरोना चाचणीही मोफत केली जाणार आहे. आतापर्यंत अशा ४५० प्रवाशांची व्यवस्था करून पालिकेने आपली माणुसकी जपली आहे.

ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व आणि युरोप येथून आलेल्या प्रवाशांना कोरोना झालेला नाही, याची खात्री होईपर्यंत त्यांची व्यवस्था मुंबईतील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. मात्र पालिकेने निवडलेल्या हॉटेलचा सात दिवसांचा खर्च काही प्रवाशांना परवडणारा नाही. त्यामुळे आपल्या राहण्याची व्यवस्था अन्य ठिकाणी करावी, अशी विनंती पालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार भायखळा येथील केंद्रात अशा ४५० प्रवाशांच्या मोफत राहण्या-जेवण्यापासून ते मोफत कोरोना चाचणीची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली आहे.

७५ प्रवाशांना डिस्चार्ज -
जम्बो सेंटरमध्ये नाश्ता व तीनवेळा मोफत जेवण दिले जाते. क्वारंटाइन करण्यात आलेल्या प्रवाशांनी सात दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली जाते. असे आतापर्यंत ७५ हून अधिक प्रवाशांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र, या केंद्रातील सर्व सेवा मोफत असून कोरोना बाधित रुग्णांना मात्र येथे ठेवण्यात येत नाही. केवळ कोरोना संशयित व्यक्तींना येथे सात दिवस ठेवण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad