कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापराची संमती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2021

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापराची संमती




मुंबई : भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. 

भारतात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती लसीकरणाच्या मोहिमेची. कालच ड्राय रनही पार पडला. आता प्रतीक्षा होती ती आपात्कालीन वापरासाठी दोन्ही लसींना संमती मिळते की नाही याची.. दरम्यान दोन्ही लसींना संमती देण्यात आली आहे. लसीकरणाच्या मोहिमेतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

या दोन्ही व्हॅक्सिन अर्थात लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं डीसीजीआयने म्हटलं आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान करोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येतं असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. याबाबत डीसीजीआयचे व्ही. जी. सोमानी यांना विचारलं असता, ”आम्ही कधीही अशा लसीला संमती देणार नाही जी नपुंसकत्व आणते. या दोन्ही लसी १०० टक्के सुरक्षित आहेत. लस घेतल्याने पुरुषांना नपुंसकत्व येतं असं म्हणणं साफ चुकीचं आहे. अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये.” असं सोमानी यांनी स्पष्ट केलं.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad