संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2021

संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळणार


नवी दिल्ली: देशातील सर्व लोकांना करोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठीड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली.

नवी दिल्ली: देशातील सर्व लोकांना करोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी (Vaccination) ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली.

कोणाला लस टोचायची आहे याबाबत सरकार निश्चिती करत असून पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांना लस टोचली जाणार आहे. यात आरोग्य कर्मचारी, करोना योद्धे, ५० वर्षांहून अधिक वय असलेले नागरिक आणि इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांचा समावेश असेल.

लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील करोना लशीबाबत अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. लशीची सुरक्षा आणि तिचा योग्य उपयोग करून घेणे ही आमची प्राथमिकता असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते. पोलिओ उन्मूलनासाठी लशीकरणाच्या वेळी देखील अनेक प्रकारच्या अफवा पसरलेल्या होत्या. मात्र लोकांनी लस घेतली आणि आता भारत पोलिओमुक्त झालेला असल्याचेही ते पुढे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad