मुंबई - आज राज्यात २ हजार ९१० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९ लाख ८७ हजार ६७८ वर पोहोचला आहे. राज्यात आज ५२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५० हजार ३८८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५१ हजा ९६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज ३ हजार ३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १८ लाख ८४ हजार १२७ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३७ लाख ४३ हजार ४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ८७ हजार ६७८ नमुने म्हणजेच १४.४६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख २४ हजार ७०५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ५१ हजार ९६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
No comments:
Post a Comment