उद्यानाच्या विकास निधीतील कपातीला भाजपचा विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 January 2021

उद्यानाच्या विकास निधीतील कपातीला भाजपचा विरोध



मुंबई - कोरोनाचा बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे मुंबई महापालिकेने विकास निधीच्या खर्चात काटकसर करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्यानाच्या विकासासाठी असलेल्या निधीत २५ टक्के कपात महाापालिका प्रशासनाने केली आहे. याला भाजपने विरोध केला असून निधी पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे. 

मुंबई महानगरपालिकेकडून उद्यान विकासासाठी असणाऱ्या निधीत पंचवीस टक्के कपात करण्यात आली आहे. या निर्णयाला बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक पंकज यादव यांनी हरकतीचा मुद्दा मांडत विरोध केला आहे. शहरातील उद्यान विकासासाठी असणाऱ्या निधीत कपात करताना याची जराही माहिती बाजार व उद्यान समितीच्या सदस्यांना देण्यात आलेली नाही, हे खेदजनक असल्याचे समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे. 

गेले आठ महिने शहरातील उद्याने बंद असल्याने उद्यानाची दुरावस्था झाली आहे. वृद्ध व बालके यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अनेक उद्यानातील पेव्हिंग ब्लॉक उखडले आहेत. झाडांची अवस्था बिकट झाली आहे. प्रसाधनगृहांची मोडतोड झाली आहे. उद्यानांमधील खेळणी, साहित्य नादुरुस्त झाले आहे. अशा परिस्थिती उद्यान विकासासाठी असणाऱ्या निधीत कपात करणे संयुक्तिक ठरणार नाही. 

कोविड परिस्थितीत हळूहळू जनजीवन पूर्ववत होत आहे. सर्वसामान्य नागरिक फिरण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. कोविडला सक्षमपणे सामोरे जाताना स्वच्छ हवा आणि ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे शहरातील बगीचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. असे असताना उद्यान विकास निधीत कपात करण्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून उद्यान विकासासाठी असणाऱ्या निधीमध्ये कपात करू नये. असा हरकतीचा मुद्दा मांडून भाजपने लक्ष वेधले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad