मुंबई - विरोधी पक्ष कॉंग्रेसचे रवी राजा हे गेले दहा दिवस विविध प्रकारचे आरोप करत आहेत, माध्यमांसमोर वाटेल ते बोलत आहेत, त्यावरून ते वैफल्यग्रस्त आणि सैरभैर झाल्याची टीका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली.
चिटणीस विभागाने काँग्रेस नगरसेविकेला पाठविलेल्या नोटिशीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, रवी राजा संभ्रमित आणि सैरभैर झाले आहेत. त्यामुळेच ते सत्ताधारी शिवसेनेवर बेछूट आराेप करत जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा प्रत्याराेप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला.
विरोधकांची भूमिका आडमुठेपणाची -
काेराेनाच्या काळात खर्च झालेले १६०० काेटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. आणखी ४०० काेटी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्यानंतर भाजपने जोरदार आक्षेप घेतला. काँग्रेसचे रवी राजा यांनीही त्याबाबत हरकत घेत. मात्र मतदानाने प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र गेल्या दहा दिवसांपासून विरोधी पक्षनेते रवी राजा हे राजकीय दृष्टीने स्वतःच्या हितासाठी शिवसेनेवर बेछूट आरोप करीत आहेत. मात्र त्यांचे हे आरोप चुकीचे आहेत. मुंबईतून कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे महापालिकेला निधी उपलब्ध करून न देणे चुकीचे आहे. विरोधकांची ही भूमिका आडमुठेपणाची आहे, असे जाधव म्हणाले.

रवी राजा संभ्रमित -
रवी राजा हे सध्या संभ्रमित आहेत. मंत्र्यांचे ऐकायचे की काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षांचे ऐकायचे याबाबत त्यांच्यात संभ्रम आहे. स्थायी समितीत विरोधकांना जास्त वेळ बोलण्याची संधी देत असतानाही मुस्कटदाबी करण्यात येत असलेला आरोप त्यांची कीव करण्यासारखा आहे, असेही जाधव म्हणाले.
शिवसेना स्वबळावरच -
निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले की, २०१७ ची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवली होती. त्यामुळे स्वबळाची भीती आम्हाला दाखवू नये. मात्र दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही, असेही जाधव म्हणाले.
चिटणीसांशी बोलताना तारतम्य बाळगावे -
महासभेला गैरहजर राहणाऱ्या सात नगरसेवकांना पालिका चिटणीस खात्याचे नोटीस बजावली. मात्र काँग्रेस नगरसेविकेला पाठविलेल्या नोटिशीवरून चिटणीसांना कॉंग्रेसकडून लक्ष्य करणे योग्य नव्हे. चिटणीस एक महिला आहेत. त्यांचा आदर करा. नोटीस काढणाऱ्या उपचिटणीसांकडे खुलासा मागण्यात आला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत असे जाधव यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment