मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणे किंवा सीमांवर लढणे हे हा राष्ट्रभक्तीचा परमोच्च बिंदू असला, तरी प्रत्येकाच्या नशिबी ते भाग्य नाही. देशाच्या समस्यांमुळे अस्वस्थ होणे आणि त्या सोडविण्याची उमेद असणे आणि त्यासाठी काम करणे ही राष्ट्रसेवा आहे, तरुणांनी या मार्गावर काम केले पाहिजे. केवळ निवडणुका जिंकणे हे भाजपचे उद्दिष्ट नाही. तर युवा पिढी घडविणे हे पक्षाचे ध्येय आहे, त्यासाठी पक्षाच्या माध्यमातून अविरत काम होणे गरजेचे आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने मुंबईत आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोच्या धर्मपरिषदेत ‘माझ्या बंधू भगिनीनो’ अशी भाषणाची सुरुवात करून विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. नवभारताची संकल्पना रचणारे विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय युवा दिवस साजरा करतो. पराधीन राष्ट्र अशी आपली तेव्हा प्रतिमा होती. परंतु आपण या देशातून आलो आहोत, ज्याने कधी कोणावर आक्रमण केले नाही, ज्यांच्यावर अत्याचार करून अन्य देशांनी काढून टाकले, त्यांनाही भारताने सामावून घेतले. देशभक्ती हाच आमचा धर्म आहे, असा विचार त्यांनी दिला. हिंदू धर्म हा प्रत्येक धर्माला त्यांच्या धर्मांचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य मानतो, असे त्यांनी त्या भाषणात सांगितले आणि युवा हा शब्द उलटा केला तर वायू होतो. युवा प्राणवायू बनतील. पण त्यांना योग्य संधी द्या. मातृभूमीचे संरक्षण करण्यासाठी तरुणांची शक्ती महत्त्वाची आहे. ती जबाबदारी युवकांची आहे. ही भूमी देशाला संदेश देऊ शकते, असे स्वामी विवेकानंद यांनी शिकवले, त्याचे अनुकरण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. केवळ निवडणुका जिंकणे हे भाजपचे उद्दिष्ट नाही. तर युवा पिढी घडविणे हे पक्षाचे ध्येय आहे, त्यासाठी पक्षाच्या माध्यमातून अविरत काम होणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
युवा हा शब्द उलटा केला तर वायू होतो. युवा प्राणवायू बनतील. पण त्यांना योग्य संधी द्या. मातृभूमीचे संरक्षण करण्यासाठी तरुणांची शक्ती महत्त्वाची आहे. ती जबाबदारी युवकांची आहे. ही भूमी देशाला संदेश देऊ शकते, असे स्वामी विवेकानंद यांनी शिकवले, त्याचे अनुकरण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. केवळ निवडणुका जिंकणे हे भाजपचे उद्दिष्ट नाही. तर युवा पिढी घडविणे हे पक्षाचे ध्येय आहे, त्यासाठी पक्षाच्या माध्यमातून अविरत काम होणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment