मुंबई - मुंबई सुंदर दिसावी म्हणून पुढील 15 दिवसांत शहरात लटकणाऱ्या ओव्हरहेड वायरी काढून टाकल्या जातील, अशी माहिती र्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. त्याचबरोबर मुंबईमध्ये इंटिग्रेट ट्रान्सपोर्ट सिस्टम उभारणे, कॉमन तिकीट सिस्टम, मुंबईमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी भूमीगत टाक्या उभारणे, मिनी पंपिंग स्टेशन उभारावेत आदी प्रकल्पांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.
छोटी पंपिंग स्टेशन उभारणार -
मुंबईत दरवर्षी पावसाचे पाणी साचते. मुंबईत पाणी साचण्याची 380 ठिकाणे आहेत. ही ठिकाणे कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. माहुलच्या पंपिंग स्टेशनला केंद्र सरकारची अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल. मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी छोटी पंपिंग स्टेशन उभारली जातील, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. मुंबईमध्ये रस्ते आणि पतपथे चालण्यायोग्य करणे, रस्त्यावरील लाईटचा उजेड पदपथावरही पडावा, अशी सुविधा केली जाईल असेही ठाकरे म्हणाले.
No comments:
Post a Comment