मुंबईत नाईट क्लबमध्ये धिंगाणा, सुधारले नाहीत तर नाईट कर्फ्यु - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 December 2020

मुंबईत नाईट क्लबमध्ये धिंगाणा, सुधारले नाहीत तर नाईट कर्फ्यु



मुंबई - मुंबईत कोरोनाचा धोका अद्याप कायम असतानाही नाईट क्लबकडून सोशल डिस्टनसिंगचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री उशिरापर्यंत शेकडो नागरिक विनामास्क एकत्र येत असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. २० डिसेंबरपर्यंत यात सुधारणा झाली नाही तर रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लावला जाईल असा इशारा पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला आहे.

मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात असले तरी दुसरी लाट कोणत्याही क्षणी येऊ शकते. असे असताना मुंबईतील नाईट क्लबकडून कोरोना संदर्भातील मार्गदर्शन तत्वांचे पालन केले जात नाही. नाईट क्लबमध्ये ५० लोक असावेत व रात्री ११ पर्यंत बंद करणे बंधनकारक असताना हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. पालिकेकडे तक्रारी आल्यानंतर गेल्या शनिवारी रात्री १२ वाजता परळच्या एपीटोम नाईट क्लबमध्ये पालिकेच्या अधिका-य़ांनी पाहणी केली. यावेळी येथे सुमारे दोन हजार नागरिक या क्लबमध्ये विनामास्क रात्री उशिरापर्यंत एकत्र आल्याचे निदर्शनास आले. पालिकेने नियमानुसार कारवाई केली. मात्र इतके लोक तेही विनामास्क एकत्र आल्याने कोरोना संसर्ग वाढू शकतो. याची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला याबाबत पत्र पाठवून निदर्शनास आणून दिले आहे. मुंबईतील सर्व नाईट क्लबवर पालिकेचा वॉच असणार आहे. येत्या २० डिसेंबरपर्यंत नाईट क्लबने सुधारणा केली नाही तर नाईलाजाने रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लावला जाईल, असा इशारा आयुक्त चहल यांनी दिला आहे.

एपिटोनवर गुन्हा -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आल्याने अनलॉक टप्प्या- टप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली. यावेळी नाईट क्लबही एसओपीचे पालन करून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र नाईट क्लबकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत. एपीटोन या नाईट लाईफ हाऊसमध्ये दोन हजार लोक एकत्र येणे हे धोक्याचे आहे. सकाळी चार वाजेपर्यंत हे क्लब सुरु राहिल्याने या क्लबवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

२० डिसेंबरपर्यंत कोरोना स्थितीचा अभ्यास करणार -
दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आतापर्यंत कोरोनास्थिती नियंत्रणात व समाधानकारक आहे. मात्र तरीही २० डिसेंबरपर्यंत कोरोनाच्या स्थितीचा अभ्यास करणार आहोत. आजची स्थिती तोपर्यंत कायम राहिल्यास पुढचे महत्वाचे निर्णय घेतले जातील. त्यामुळे मुंबईकरांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad