मुंबई - शिवसेनेचे माजी खासदार आणि शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील एक शिलेदार म्हणून ओळखले जाणारे सर्वसामान्याचे नेते आणि 'परळ ब्रँड' अशी ओळख असलेले मोहन रावले यांचे गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे.
मोहन रावले हे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते ५ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. मुंबईतील परळ-लालबाग भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. शिवसेनाप्रमुख बााळासाहेब ठाकरे यांचे रावले हे निकटवर्तीय समजले जात. मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आज संध्याकाळी आणलं जाणार आहे. दादर मधील त्यांच्या घरी पार्थिव आणल्यानंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या परळ शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतीम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्या त्याचा वाटा मोठा होता. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. मोहन रावले गेले, असे सांगत कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त आणि शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले नेते असे वर्णन करत संजय राऊत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोहन रावले यांची 'परळ ब्रँड' शिवसैनिक हीच ओळख होती. मोहन रावले पाच वेळा खासदार झाले, मात्र अखेरपर्यंत ते सगळ्यांसाठी मोहनच राहिले असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment