गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्याही हजारच्या आत येत असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही ९३ टक्क्यांवर पोहोचले आहे. मृत्यूदरही कमी झाला असून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. कोरोनावरील विविध कंपन्यांच्या तीन लसींची अंतिम चाचणी देशभरात सुरू आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई अंतिम टप्प्यात आली असून आता केवळ लसीकरणाची प्रक्रिया राबवली जाणे बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर, लसीकरण तातडीने पार पडावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाबाबत प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, जागतिक आरोग्य संघटनेचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात येत आहे हे दुसरे प्रशिक्षण शिबिर असून पुढील आठवड्यात आणखी चार ते पाच प्रशिक्षण शिबिर घेतली जातील. त्यामधून तयार झालेले मुख्य प्रशिक्षक इतर २५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील अशी माहिती जगताप यांनी दिली.
राज्य सरकारकडून ८ मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे ८ मुख्य प्रशिक्षक पालिकेच्या रुग्णालयातील व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षणातून मुख्य प्रशिक्षक निर्माण केले जात आहेत. जे मुख्य प्रशिक्षक पालिकेच्या २४ वॉर्डमधील सुमारे २५०० कर्मचार्यांना प्रशिक्षण देणार आहेत. या कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी ५ व्यक्तींची ५०० पथके तयार केली जाणार आहेत. कोरोना लसीच वितरण, नियोजन, तिचा वापर, रुग्ण लस देताना घ्यावयाची काळजी, रुग्णांना साइडइफेक्ट झालं तर काय कराव, लसीकरणमध्ये वापरण्यात येणार सॉपटवेअरच्या हाताळणीचे प्रशिक्षण सुद्धा दिल जात आहे. ही प्रशिक्षण प्रक्रिया जानेवारीच्या शेवटपर्यंत पूर्ण होणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment