"आत्मचिंतनाची गरज भाजपलाच" - परिवहनमंत्री अनिल परब - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 December 2020

"आत्मचिंतनाची गरज भाजपलाच" - परिवहनमंत्री अनिल परब




मुंबई (४ डिसेंबर) - "आत्मचिंतनाची गरज शिवसेनेला नसून भाजपलाच आहे," अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या निकलांबाबत आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. "तीन चाकांच्या रिक्षाने आज बुलेट ट्रेनला हरवले असा खोचक टोला त्यांनी लगावला. तीन पक्ष एकत्र आले तर काय निकाल लागू शकतो हे महाविकास आघाडीने दाखवून दिले आहे."

अमरावती शिक्षक मतदारसंघाबाबत बोलताना परब म्हणाले की, "ती जागा यापूर्वी देखील शिवसेनेची नव्हती. याअगोदर तिथे अपक्षच निवडून आले होते व आता देखील तिथे अपक्षच निवडून आले आहेत. ती जागा भाजपने आताही जिंकली नाही.याउलट भाजपने त्यांच्या परंपरागत निवडून येणाऱ्या नागपूर पदवीधर सारख्या जागा गमावल्या आहेत त्यामुळे त्यांनीच आत्मचिंतन करावे."

महाविकास आघाडीबाबत प्रतिक्रिया देताना "महाराष्ट्रात यापुढे महाविकास आघाडी एकत्र लढल्यास दुसऱ्या कोणत्याच पक्षाला जागा राहणार नाही. या निवडणुकीत तीनही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढले व हे त्याचेच यश आहे. तीन पक्षांचे झेंडे जरी वेगवेगळे असले तरी अजेंडा मात्र एकच आहे. तीनही पक्षांच्या प्रमुखांनी ठरवलेल्या किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे" असे परब म्हणाले.

अमृता फडणवीसांबाबतीत विचारलेल्या प्रश्नावर, त्या राजकीय व्यक्ती नसल्यामुळे मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad