महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह , डाॅ बाबासाहेब आंबेडकर भवन तसेच जगप्रसिध्द चैत्यभूमी दादर या ठिकाणी असल्याने घटनाकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी आग्रही मागणी अनेक वर्षा पासून आंबेडकरी जनतेमधून होत आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी चैत्यभूमीवर तसेच दादर रेल्वे स्टेशन वर अनेकदा आंदोलने स्वाक्षरी मोहीम , दादर रेल्वे स्थानकाचे प्रतिकात्मक नामांतरे ,रेल्वे मंत्री मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार ईमेल आदी करून देखील केंद्र किंवा राज्य सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याची नाराजी भीम आर्मी सह आंबेडकरी जनतेने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार सोबत पत्रव्यवहार ठराव करून आतापर्यंत राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांची नामांतरे करून घेतली परंतु देशाला भारतीय संविधान देणारे जगातील एकमेवद्वीतीय विद्वान प्रकांडपंडीत असलेल्या महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी आंबेडकरी जनतेला वारंवार आंदोलने करून निवेदने द्यावी लागतात.अशी खंत भीम आर्मीचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य व माजी महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी देखील भीम आर्मीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना ईमेल तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांमार्फत दादर रेल्वे स्थानकाचे डाॅ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस असे नामांतर करावे अशी लेखी मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने ईमेलला उत्तरे पाठवताना आपला विषय पुढील कार्यवाहीसाठी परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला आहे अशी अजब उत्तरे दिल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
दरम्यान मुंबईत पुढील आठवड्यात सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात दादर रेल्वे स्थानकाला डाॅ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस अशा नामांतराचा ठराव राज्य सरकारने करावा अशी मागणी भीम आर्मीने आंबेडकरी जनतेच्या वतीने केली आहे. हिवाळी अधिवेशनात हा ठराव न केल्यास दादर नामांतरासाठी राज्य सरकार विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्यात येईल असा ईशारा अशोकभाऊ कांबळे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment