मुंबई / 6 डिसेंबर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदुमिल येथे भव्य स्मारक उभे राहणार आहे. त्याच पद्धतीने चैत्यभूमीचा विकास करून तेथे दीक्षाभूमी सारखा भव्य स्तूप उभारावा. सध्या चैत्यभूमीची वास्तू जुनी आणि थोडी कमकुवत झाली आहे. या वास्तूची डागडुजी केली जाते मात्र आता या वास्तूची पुनर्बांधणी आवश्यक असल्याचे सांगत चैत्यभूमी येथे भव्य स्तुप उभारण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 64 व्या महावरीनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे आयोजित अभिवादन सभेत ना रामदास आठवले यांनी केली. आज चैत्यभूमी स्मारकात रामदास आठवले यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी राज्याचे राज्यपाल महामाहिम भगतसिंह कोश्यारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सह राज्य मंत्री मंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्याचा संदेश दिला.त्यांनी जगातील सर्वश्रेष्ठ ठरलेले भारताचे संविधान साकार केले. संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मीयांचे कल्याण केले आहे. देश एकजूट ठेवण्याच्या केंद्रस्थानी संविधान आहे. सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करण्याचे उद्दिष्ट्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे होते. त्यांच्या स्वप्नातील समतावादी भारत ; संविधानातील भारत साकार करण्याचा निर्धार करू हेच खरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन ठरेल असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले.
No comments:
Post a Comment