मुंबई महापालिकेच्या सर्व जागा लढवण्याचा प्रयत्न - भाई जगताप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2020

मुंबई महापालिकेच्या सर्व जागा लढवण्याचा प्रयत्न - भाई जगताप



पुणे - कोणत्याही पक्षासाठी जागावाटप हा मोठा अडचणीचा विषय असतो. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा झेंडा अंगाखांद्यावर घेऊन जे कार्यकर्ते आपापल्या विभागात काम करत आहेत, त्यांचा विचार करता मुंबईतील सर्वच्या सर्व 227 जागांवर निवडणूक लढवण्यास मला आवडेल आणि त्या दिशेने माझे प्रयत्न असतील, असे सांगत मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा इशारा दिला आहे. मुंबई काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाई जगताप यांनी जेजुरीतील खंडोबाचे दर्शन घेतले, त्‍यानंतर पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाई जगताप म्हणाले, की आजवर महापालिकेच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्यांकडे आम्ही गंभीरपणेच पाहिले आहे. 2009 साली जेव्हा निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसचे अनेक आमदार, 74 नगरसेवक निवडून आले होते. आता महापालिकेत काँग्रेसचे 32 नगरसेवक आहेत. आमच्यासमोर अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान आहे. आता काँग्रेसची अनुभवी टीम माझ्यासोबत आहे. या सर्वांना घेऊन आगामी काही महिन्यात चांगले उपक्रम राबवून मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचे माझे प्रयत्न राहतील. काँग्रेस नेतृत्वाने माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे, त्याला पूर्णतः न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन. आमच्यासमोर काही आव्हाने आहेत, पण आम्ही ती पेलू अशी मला खात्री आहे, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad