मुंबई दि.13 - महाराष्ट्र सरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल ? असा मिश्किल सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
रामदास आठवले हे रंगीबेरंगी नक्षीकाम वाले पोशाख परिधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच मीश्किलीपणे खुसखुशीत विनोद करण्यात ही ते प्रसिध्द आहेत. त्यानुसार मंत्रालयात ड्रेसकोडच्या बातमीवर रामदास आठवले यांनी मिश्किलपणे आपल्याला मंत्रालयात प्रवेश मिळेल का असा प्रश्न विचारला आहे.
No comments:
Post a Comment