सिनेमागृहांचा पडदा उद्यापासून उघडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2020

सिनेमागृहांचा पडदा उद्यापासून उघडणार


मुंबई - लॉकडाऊन संपून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्यात येत आहे. राज्यातील गेल्या सात महिन्यांहून अधिक काळासाठी बंद असलेल्या सिनेमागृहांसाठीही राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून म्हणजेच ५ नोव्हेंबरपासून राज्यातील सिनेमागृह व नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबरोबरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर गर्दी टाळण्याच्या उद्देशानं सिनेमागृह देखील बंद ठेवण्यात आली होती. आता मिशन बिगीन अगेन अतर्गंत अनेक सेवा पुन्हा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. सिनेमागृह, नाट्यगृह मल्टिप्लॅक्स ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत उद्यापासून सुरू होणार आहेत. त्याचबरोबर, जलतरण तलावही उद्यापासून सुरू होणार आहेत.

सप्टेंबरमध्येच केंद्रानं सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी दिली होती. मात्र, राज्यातील सिनेमागृहांबाबत कोणताही निर्णय तेव्हा घेण्यात आला नव्हता, राज्य सरकारने आज अनलॉक प्रक्रियेत काही निर्णय घेतले असून त्यात सिनेमागृह उद्या गुरुवार दि. ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सिनेमागृहांसाठी सांस्कृतिक कार्य विभागाने जी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत ती या सेवेसाठी लागू असतील. त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे.

कंटेन्मेंट झोनच्या बाहेर स्विमिंग पूल सुरू होणार आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करावे तसंच, सॅनिटायझेशन करावे, अशा सूचना सरकारने केल्या आहेत. तसंच, योगा इन्स्टिट्युड, इनडोअर गेम्स या सेवांनादेखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या सेवां सुरू करण्यापूर्वी करोना संदर्भातील सर्व नियम पाळणं बंधनकारण असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad