उद्यापासून लोकलच्या २७७३ फेऱ्या चालवण्यात येणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 November 2020

उद्यापासून लोकलच्या २७७३ फेऱ्या चालवण्यात येणार



मुंबईः सर्वांसाठी लोकल प्रवासाचा तिढा कायम असताना मुंबई लोकलच्या फेऱ्यांमध्ये आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेनं याबाबत आज एक संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरील विशेष लोकलच्या एकूण फेऱ्यांच्या संख्येत आजपासून २०२० फेऱ्या सुरु केल्यानंतर उद्यापासून त्यात ७५३ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनानं करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व सोशल डिस्टनसिंग हे सर्व मुद्दे लक्षात घेत लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आजपासून २०२० फेऱ्या सुरू केल्यानंतर, उद्यापासून त्यात ७५३ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी एकूण २७७३ फेऱ्या चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ५५२ तर पश्चिम रेल्वेवर २०१ फेऱ्यांची वाढ करण्यात आली. या लोकल फेऱ्यांमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि महिला प्रवाशांना प्रवासाची मुभा असणार आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकलसेवा बंद आहे. सर्वसामान्यांनासाठी लोकल सेवा खुली करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेला प्रस्ताव दिला आहे. मात्र, तो प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आलेला नाहीये. दरम्यान, राज्य सरकारच्या विनंतीनुसार लोकल फेऱ्या टप्याटप्याने वाढवण्यात येत आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळं सर्वसामान्यांनासाठी लोकलचे दार कधी उघडणार याची प्रतीक्षा प्रवाशांना कायम आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका 
मुंबई उपनगरीय लोकलबाबत अनेक अफवा वेळोवेळी पसरवल्या जात असतात. ती बाब ध्यानात घेऊन कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. करोना संसर्गाच्या अनुषंगाने जे वैद्यकीय व सोशल डिस्टन्सिंगचे नियम आहेत त्याचे प्रवाशांनी काटेकोरपणे पालन करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad