राज्यात ५ हजार ७५३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 November 2020

राज्यात ५ हजार ७५३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान



मुंबई - राज्यात आज ५ हजार ७५३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ लाख ८० हजार २०८वर पोहोचला आहे. राज्यात आज ५० करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४६ हजार ६२३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८१ हजार ५१२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ४ हजार ६० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख ५१ हजार ६४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ५० करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ६ मृत्यू हे या आठवड्यातील, तर १४ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २ लाख १३ हजार २६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ८० हजार २०८ नमुने म्हणजेच, १७.४२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख १५ हजार ९७६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये, तर ५ हजार ६१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ८१ हजार ५१२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले -
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५००वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४००वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८००वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५ हजार ९८४ रुग्ण, २६ ऑक्टोबरला ३ हजार ६४५ रुग्ण, ७ नोव्हेंबरला ३ हजार ९५९ रुग्ण, १० नोव्हेंबरला ३ हजार ७९१ रुग्ण, १५ नोव्हेंबरला २ हजार ५४४ रुग्ण, १६ नोव्हेंबरला २ हजार ५३५ रुग्ण, १७ नोव्हेंबरला २ हजार ८४० रुग्ण, २० नोव्हेंबरला ५ हजार ६४० रुग्ण, तर २१ नोव्हेंबरला ५ हजार ७६० रुग्ण आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad