मुंबई - मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयावर केलेल्या तोडक कारवाई विरोधात न्यायालयाने आदेश देत नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका 'नटी'साठी न्यायालयाने असे आदेश दिल्याने मुंबईकर अचंबित झाले आहेत. एका 'नटी'ला वेगळा न्याय आणि सामान्य मुंबईकरांना वेगळा न्याय का असा प्रश्न उपस्थित करत या निर्णयाची प्रत आल्यावर त्यावर विचार विनिमय करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. काही राजकीय पक्षांनी कोर्टालाही राजकीय आखाडा बनवला आहे अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
कंगना रणौत या अभिनेत्रीने मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर पालिकेने वांद्रे पालिहील येथील मणिकर्णिका फिल्म्सचे घरात बनवलेल्या कार्यलयात बेकादेशीर बांधकाम झाल्याप्रकरणी नोटीस बजावून तोडकाम केले होते. त्याविरोधात कंगनाने उच्च न्यायालयात घेतली. याप्रकरणी पालिकेने केलेली कारवाई सूडबुद्धीने केल्याचे म्हणत नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर महापौर बोलत होत्या.
यावेळी बोलताना ३५४ (अ) ची नोटीस पालिकेने पहिल्यांदाच दिलेली नाही. याआधीही अनेकांना ही नोटीस दिली आहे. त्यावेळीही नोटीस दिलेले लोक कोर्टात गेले. त्याप्रकरणी कोर्टाने मुंबई महापालिकेच्या कायद्याप्रमाणे कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. आज जो काही निकाल आला आहे हा एका 'नटी'साठी आला आहे. 'नटी'ला वेगळा न्याय आणि मुंबईकर नागरिकांना वेगळा न्याय हे यावरून दिसत आहे. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. कोर्टाचा आम्हाला आदर आहे. कोर्टाने जो निकाल दिला आहे त्याची प्रत अजून आमच्यापर्यंत पोहचलेली नाही. निकालाची प्रत आल्यावर पालिका कुठे कमी पडली का, यापुढे काय भूमिका घ्यावी यावर कायदा विभाग आणि आयुक्त यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे महापौरांनी सांगितले.
बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी पालिकेने ३५४ (अ) ची नोटीस दिल्यावर अनेक जण कोर्टात गेले आहेत. त्यावेळी कोर्टाने मुंबई महापालिकेच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कंगनाच्या प्रकरणात नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून सामान्य मुंबईकरांना एक न्याय आणि एका नटीला एक न्याय असे यावरून दिसत आहे. याप्रकरणी जो निकाल दिला आहे त्यावरून मुंबईकर अचंबित झाले असून या प्रकरणात जो निकाल दिला आहे त्याचा फायदा मुंबई आणि महाराष्ट्रातील नागरिकांनाही पुढे होईल असे महापौरांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण -
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील पाली हिल स्थित कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमण संदर्भात कारवाई केली होती. याविरोधात कंगनाने मुंबई महानगरपालिकेकडे दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई महानगरपालिकेतून या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करताना म्हणण्यात आले होते की कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई योग्य असून तिने दाखल केलेली याचिका ही फेटाळून लावण्यात यावी. कंगनाने मागितलेली नुकसान भरपाई म्हणजे कायद्यासोबत झालेले गैरवर्तन असल्याचही मुंबई महानगरपालिकेने म्हटले होते.
No comments:
Post a Comment