ऊर्जा खात्याला कोण बदनाम करण्याचा प्रयत्न करतंय? - आशिष शेलार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 October 2020

ऊर्जा खात्याला कोण बदनाम करण्याचा प्रयत्न करतंय? - आशिष शेलार


मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि मुंबईनजिकच्या बाजूबाजूच्या शहराची सोमवारी अचानक लाईट गेली. हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय. तसंच, ऊर्जा खात्याला बदनाम करण्यासाठी कोणीतरी असा प्रकार असल्याचंही राऊत म्हणाले. यावर, भाजपचे नेते आशिष राऊत यांनी प्रतिप्रश्न केला आहे. या खात्याला बदनाम करण्याचा कोण प्रयत्न करते आहे? असं त्यांनी विचारलं.

आमदार आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित करीत लिहील्या पत्रात म्हटले आहे की, अचानक मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबईसह पालघर पर्यंतच्या भागाचा वीज पुरवठा अचानक पुर्णत: खंडित झाल्याने एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थी, प्रवासी, रूग्ण यांच्यासह नागरिकांचे अतोनात हाल झाले. तसेच मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीच्या सर्व सेवा अचानक कोलमडल्याने याबाबत सर्वदूर बदनामी तर झालीच तसेच मोठे नुकसानही झाले. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून या घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित झाले असून त्याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. सरकारने त्याची उत्तरे दिलेली नाहीत. हा प्रकार घातपात असवा असा संशय खुद्द उर्जा मंत्री व्यक्त करीत आहेत. त्यामुळे याची गंभीरता अधिकच वाढत असून याकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यामुळे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करुन आपले या विषयाच्या गांभीर्याकडे आम्ही लक्ष वेधू इच्छितो.

ही घटना मानवी चुकांमुळे घडल्याचे सांगण्यात येत आहे. मग या घटनेला जबाबदार कोण? घटनेच्या चौकशीला विलंब का? संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली?
अद्याप कुणावरही कारवाई का करण्यात आली नाही? ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देणार का?
सदरची घटना ही घातपात असल्याचा संशय ऊर्जा मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तर मग याबाबत तपास यंत्रणाना अवगत करण्यात आले का? तपास यंत्रणाना याबाबत काही तपास करणार आहेत का?
ऊर्जा खात्याला काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वारंवार ऊर्जा मंत्री सांगत आहेत तर मग कोण या खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे?
सन 2010 साली अशी घटना घडली होती त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या अजय मेहता समितीच्या अहवालाच्या शिफारशी सरकारने स्विकारल्या होत्या का? असल्यास त्यानुसार उपाय योजना करण्यात आल्या का?
भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून अजय मेहता समितीचा अहवाल व सूचना याबाबत येणाऱ्या काळात शासन कोणत्या उपाय योजना करणार आहे?

असे प्रश्न उपस्थित करुन याबाबतीत अधिक स्पष्टता यावी व भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून शासनाने करावयाच्या उपाय योजनांचा तातडीने खुलासा करावा, ही विनंती आमदार आशिष शेलार यांनी पत्रात केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad