मुंबई – राज्य सरकारकडून धार्मिक स्थळे सुरू होण्याबाबत दिरंगाई होत असल्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्ऱ्यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रावरून राज्यात सध्या जोरदार वाद-प्रतिवाद सुरू आहेत. त्यातच, मुख्यमंत्र्यांना जाब विचारणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या विरोधात शिवसेनेची महिला आघाडी सक्रीय झाली आहे.
आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही असं शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी म्हटलं आहे. त्या पुढे म्हणाल्या की,, “अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये”.
“आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना पक्षाची ही चौथी पिढी राजकारणात आहे. आम्हाला काय करायचं हे शिकवू नये आणि आमचं तोंड उघडू नये. आम्हाला निश्चित संस्कृती आहे. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
काय म्हणाल्या आहेत अमृता फडणवीस?
“वाह प्रशासन! बार आणि लिकर शॉप्स सुरु झाले आहेत मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टींसाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते”
No comments:
Post a Comment