मुंबई, दि.२७ : राज्यात आज ७,८३६ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३९ टक्के एवढे झाले आहे.
आज राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजर ०२८ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज रोजी एकूण १ लाख ३१ हजार ५४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
No comments:
Post a Comment