नवी दिल्ली: हाथरस प्रकरणावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला आहे. या देशातील लज्जास्पद सत्य हे आहे की अनेक भारतीय देशातील दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे.
हाथरसच्या पीडितेवर बलात्कार झालाच नाही, असे मुख्यमंत्री आणि त्यांचे पोलिस सांगतात, कारण त्यांच्यासाठी तसेच इतर अनेक भारतीयांसाठी पीडिता ही कोणीच नव्हती, असे राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे.
बीबीसीच्या एका बातमीवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी वरील उद्गार काढले आहेत. पोलिस आणि राज्य सरकारचे अधिकारी पुन्हा-पुन्हा सामूहिक बलात्कार झालाच नसल्याचे सांगत असल्याचे या बातमीच म्हटले आहे. बातमीवर टिप्पणी करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारची खिल्ली उडवली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'लज्जास्पद गोष्ट ही आहे की, अनेक भारतीय दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत. मुख्यमंत्री आणि त्यांचे पोलिस म्हणतात की, कोणीही बलात्कार केलेला नाही. कारण त्यांच्यासाठी, तसेच इतर अनेक भारतीयांसाठी ती कोणीच नव्हती.'
काय हाच न्याय आहे का?
या पूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विशेष विमान खरेदी करण्यावरून टीकास्त्र सोडले होते. आमच्या जवानांना बुलेट प्रूफ नसलेल्या ट्रकमध्ये पाठवले जात आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्यासाठी ८ हजार ४०० कोटी रुपयांचे विमान खरेदी केले गेले आहे, असे सांगत काय हाच न्याय आहे?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
या आधीही राहुल गांधी यांनी विमान खरेदीवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर अनेकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधानांनी स्वत:साठी ८ हजार ४०० कोटी रुपयांचे विमान खरेदी केले. मात्र, एवढ्या पैशांमध्ये सियाचीन-लडाख सीमेवरील तैनात असेलल्या आपल्या जवानांसाठी अनेक गरजेच्या वस्तू खरेदी केल्या जाऊ शकत होत्या, असे राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका करताना म्हटले होते.
No comments:
Post a Comment