आंबेडकरांची कायदेभंगाची भाषा म्हणजे जनतेला फूस - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2020

demo-image

आंबेडकरांची कायदेभंगाची भाषा म्हणजे जनतेला फूस

news+jpnnews

मुंबई: मंदिरं सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेली कायदेभंगाची भाषा म्हणजे जनतेला एक प्रकारे फूस देण्याचा प्रकार आहे, अशी टीका करतानाच आंबेडकरांनी पुकारलेल्या पंढरपुरातील आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. कोणीही आनंदाने मंदिरं बंद करत नाही. सरकार सर्व गोष्टी टप्याटप्याने सुरू करत आहे. भविष्यात लवकरच मंदिरं आणि रेल्वे सुरू करण्याची चर्चा होईल. त्यासाठी विरोधकांनी संयम बाळगायला हवा. महाराष्ट्रातील जनतेवर उपकार करा, असं राऊत म्हणाले. आंबेडकरांच्या आंदोलनात गर्दी असून रेटारेटीही सुरू आहे. हे चित्रं योग्य आणि सकारात्मक नाही. या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे, असं ते म्हणाले.

पंढरपुरात हजारो लोक जमल्याने करोनाचं संक्रमण वाढू शकतं. त्यामुळे हे आंदोलन सकारात्मक नाही. आंबेडकरांनी कायदेभंगाची केलेली भाषा ही लोकांना फूस देणारी आहे. नियम तोडून आम्ही मंदिरात जाऊ असं आंबेडकर सांगत आहेत. नियम तोडण्यासाठीच आम्ही आल्याचंही ते बोलत आहेत. आंबेडकर हे संयमी नेते आहेत. कायद्याचे अभ्यासक आणि जाणकार आहेत. ते बाबासाहेबांचे वारस आहे. किमान आरोग्य आणीबाणीच्या काळात त्यांच्याकडून कायदेभंगाची भाषा होणं योग्य नाही, असं ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages