१ हजार ९०० रुपयांत कोरोना चाचणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2020

१ हजार ९०० रुपयांत कोरोना चाचणी



मुंबई- राज्यात कोरोना चाचणींसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून ते प्रति चाचणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे, आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी १ हजार ९००, २ हजार २०० आणि २ हजार ५०० रुपये, असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.  

राज्य शासनाने समिती नेमून काही दिवसांपूर्वी कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले होते. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतल्यास २ हजार २०० रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केल्यास २ हजार ५०० रुपये दर आकारायचा असा निर्णय झाला होता. काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात, मात्र त्यांच्याकडून २ हजार ८०० रुपये आकारले जात होते. अशा वेळी त्यांच्याकडून २ हजार ८०० रुपयांऐवजी २ हजार ५०० रुपये आकारावेत, असे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले.

'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत राज्यातील लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे, चाचण्यांसाठी लागणारे रिएजंट्स, व्हीटीएम किट व पीपीई किट यांची उपलब्धता वाढल्याने त्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे, तपासणी खर्चात कपात होणे आवश्यक होते. याबाबी लक्षात घेऊन प्रयोगशाळा व किट्स उत्पादकांशी चर्चा करून समितीने शिफारशींसह आपला अहवाल शासनला सादर केला. त्यानुसार चाचण्यांचे पुन्हा सुधारीत दर निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे, आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि सॅम्पलचे रिपोर्टींग करीता २ हजार २०० रुपयांऐवजी १ हजार ९०० रुपये आकारण्यात येईल. तर, स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटर येथून स्वॅब घेतल्यास २ हजार ५०० रुपयांऐवजी २ हजार २०० आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २ हजार ५०० रुपये सुधारीत दरानुसार आकारण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad