कोरोना बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करत त्यांना बरे करण्यासाठी आरोग्य विभाग रात्रंदिवस झटत आहे. कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. आरोग्य केंद्र व पालिका रुग्णालयात येणाऱ्या कुठल्याही रुग्णाला ऑक्सिजनची गरज असल्यास उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, सिलेंडर्स पुरवठादारांशी केलेल्या चर्चेप्रमाणे मे. सतरामदास गॅसेस प्रा. लि. यांनी त्यांच्याकडील उपलब्ध ३० ड्युरा सिलेंडर तर मे. रोमेल रिअल्टर्स यांनी ७० ड्युरा सिलेंडर पुरवठा करण्यासाठी प्रक्रिया करण्यात आली. गोरेगांव स्थित नेस्को कोरोना आरोग्य केंद्रासाठी ड्युरा सिलेंडर्स पुरवठा करण्याचा अनुभवदेखील मे. रोमेल रिअल्टर्स यांना होता, हे या प्रक्रियेत लक्षात घेण्यात आले. परंतु मे. रोमेल रिअल्टर्स यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे ड्युरा सिलेंडरचा पुरवठा वेळेत झाला नाही, तसेच पुरवठा केलेल्या ड्युरा सिलेंडरसोबत त्यांची जोडसाधने पुरविली नाहीत, या कारणांनी मे. रोमेल रिअल्टर्स यांना ९ लाख ९० हजार २४७ रुपयांचा दंड ठोठावल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
महानगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर केलेल्या उपाययोजनांमुळे संबंधित रुग्णालयांमध्ये अपेक्षित आणि योग्य वेळेत ड्युरा सिलेंडर स्थापित करुन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली, परिणामी वेळीच ऑक्सिजनची सिलेंडर्स प्रमाणात उपलब्ध झाली नसल्यान दंड ठोठावल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.