मुंबई - डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही करोना संसर्गाची लागण झाली आहे. यात डॉक्टरांनाही प्राण गमवाले लागले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) यासंदर्भात केलेल्या अभ्यासामध्ये देशातील ९९ डॉक्टरांना करोना संसर्गामुळे प्राण गमावले आहेत, तर १३०२ डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर 'करोनाच्या संसर्गामध्ये रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी लढणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांकडेही गांभीर्याने पाहा,' असे 'आयएमए'ने सरकारला सूचित केले आहे.
रुग्णांना करोनापासून वाचवायचे असेल, तर डॉक्टरांच्याही आरोग्याचा विचार करायला हवा, याकडेही आयएमएने लक्ष वेधले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमुख डॉ. शिवकुमार उत्तुरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी संघटनेच्या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत, तेथील सदस्यांच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी नोंद झाली नसल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
मृत्यू झालेल्या डॉक्टरांमध्ये ३५ वर्षांखालील सात डॉक्टरांचा समावेश आहे; तर ३५ ते ५० या वयोगटामध्ये १९, पन्नास वर्षांवरील ७३ अशा एकूण ९९ डॉक्टरांचा मृत्यू करोना संसर्गामुळे झाला आहे. सर्वेक्षणातील ९२ टक्के म्हणे १,३०२ डॉक्टरांना करोनाची लागण झाली आहे. 'आयएमए'च्या राष्ट्रीय कोविड रजिस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची संख्या ५८६ इतकी असून, निवासी डॉक्टरांची संख्या ५६६ आहे, तर १५० हाऊस सर्जन्सनाही कोविडची लागण झाली आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या डॉक्टरांचे प्रमाण १३०२ इतके या अभ्यासात आढळून आले आहे.
ड्युट्यांचे तंत्र सांभाळावे -
करोनाच्या संसर्गामुळे डॉक्टरांचा मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे. रुग्णालयामध्ये संसर्ग नियंत्रणात ठेवला जातो का, यासंदर्भातही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. तरुण आणि पन्नाशीच्या पुढे असलेल्या दोन्ही गटातील डॉक्टरांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे रुग्णालयांनी संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासह सुरक्षित वावराचे निकष पाळणे, कामासाठी ड्युटीच्या वेळा निश्चित करणे, रोटेशन पद्धतीने ड्युटी लावण्याचे तंत्र सांभाळायला हवे याकडेही लक्ष वेधले आहे.