मुंबईतील १२ रुग्ण कोरोनामुक्त ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 March 2020

मुंबईतील १२ रुग्ण कोरोनामुक्त !


मुंबई - राज्यासह मुंबईत कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. रोज नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असतानाच दुसरीकडे मंगळवारी दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सरकार व आरोग्य विभागाच्या प्रयत्नाना पहिलं यश आले आहे. मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १२ कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची दुसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार व आरोग्य विभाग दिवस रात्र झटत आहे. मागील तीन दिवसांत रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. त्यामुळे चिंता वाढते आहे. असे असतानाच दुसरीकडे आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश येताना दिसते आहे. १२ रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट घेण्यात आली. यात हे सर्व रुग्ण कोरोना निगेटिव्ह आले आहेत. मात्र तरीही खबरदारी म्हणून या रुग्णांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. यानंतर त्यांची पुन्हा चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणीही निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, काही रुग्णांची कोरोना लक्षणे सौम्य आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Post Bottom Ad