पुणे जिल्हा शिक्रापूर तालुक्यातील भीमाकोरेगावा जवळील वढू बुद्रुक गावात बंदी घालण्यात आलेले मिलिन्द एकबोटे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाच्या नावाखाली वढू गावातीलसमाजी महाराज स्मारक येथे २४ मार्च रोजी कार्यक्रम घेण्याच्या प्रयत्नात असून या कार्यक्रमासाठी त्यांनी संभाजी भिडे यांच्यासह काही राजकीय पुढाऱ्यांनादेखील या गावातयेण्यासाठी निमंत्रण दिले आहे अशी माहिती कांबळे यांनी आपल्या निवेदनाद्वारे महासंचालक याना दिली आहे
पुणे जिल्हा शिक्रापूर तालुक्यातील वढू बुद्रुक या छत्रपती संभाजी महाराज स्मारक व गोविंद गोपाळ गायकवाड महार यांची समाधी असलेल्या गावात 28 डिसेंबर 2017 रोजी गोविंद गोपाळ गायकवाड महार यांच्या समाधीची मोडतोड झाली तद्नंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे शहीद स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लाखो आंबेडकरी कार्यकर्त्यांवर तसेच अनुयायांवर हल्ले करून त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या अनेकांना जखमी करण्यात आले. या दिवशी भीमा कोरेगावमधील सर्व दुकाने सरपंचाच्या आदेशानुसार बंद ठेवून लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय करण्यात आली.होती या सर्व घटनांमागे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे असल्याची तक्रार करण्यात आली असून एफ आय आर नोंद होऊन एकबोटे यांना तुरुंगात जावे लागले तसेच त्यांच्यावर वढू बुद्रुक गावात बंदी घालण्यात आली होती. त्याच प्रमाणे या दंगली संदर्भातील खटल्याची सुनावणी पुणे तसेच मुंबई उच्च न्यायालयात सुरू असून राज्य सरकारने जे एन पटेल आयोगाची स्थापना केलेली आहे अशी माहिती भीम आर्मीने पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल याना दिलेल्या तक्रारीत दिली आहे .
मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे या दोन व्यक्ती अत्यंत वादग्रस्त आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधाने व कृतींमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो .असे असतानाही छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या नावाखाली मिलिंद एकबोटे हे दिनांक 24/03/2020रोजी वढू बुद्रुक गावातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे कार्यकम घेण्याच्या प्रयत्नात असून त्यांच्या या कार्यक्रमास परवानगी नाकारून एकबोटे व भिडे यांच्यावर या गावात जाण्यास बंदी घालावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.