गेल्या २४ तासांत मुंबईत २२ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळले असून १५ रुग्ण मुंबईतील असून ७ रुग्ण मुंबईबाहेरील म्हणजे वाशी, पालघर, कल्याण डोबिंवली व पुणे येथील आहेत. गेल्या २४ तासांत आढळलेल्या रुग्णांमध्ये १६ रुग्ण हे कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांच्या संपकाॅत आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अन्य ६ रुग्ण हे परदेशातून आले आहेत. गेल्या २४ तासांत आढळलेल्या रुग्णांवर कस्तुरबा व एच.बी.टी. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत आढळलेल्या रुग्णांमध्ये सात महिन्याच्या व एक वषाॅच्या मुलाचा समावेश असल्याचे शहा यांनी सांगितले.
आज दिवसभरात तपासणी केलेले रुग्ण - २९४
संशयीत भरती केलेले रुग्ण - २०१
एकूण पाॅझिटीव्ह - १०८
आतापर्यंत मृत - ६