जीएसटी भवन ही राज्य सरकारची दहा मजली इमारत आहे. या इमारतीत साडेतीन हजार कर्मचारीवर्ग काम कार्यरत होते. मात्र फायर ऑडिटनंतर गेल्या ऑक्टोबरपासून संपूर्ण इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे तीव महिन्यांपूर्वीच इमारतीतील नवव्या व दहाव्या मजल्यावरील टेक्निकल स्टाफ लव्हलेन येथील एमटीएनएलच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला होता. त्यामुळे दोन ते सव्वा दोन हजार कर्मचारी - अधिकारी एवढा स्टाफ या इमारतीत सद्या कार्यरत आहे. आठव्या मजल्यावर आयुक्तांचे कार्यालय आहे. या कार्यालयाचे ८ -१० कर्मचारी आग लागलेल्या नवव्या मजल्यावर काम करीत होते. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास अलार्म वाजल्याने सर्व स्टाफ सतर्क झाला. जीएसटी भवनमधील असलेल्या अग्निशमन दल विभागाच्या यंत्रणेला नवव्या मजल्यावर शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात आले. इमारतीत आग लागली आहे हे कर्मचा-यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली. दलाचे कर्मचारी व काही स्फाफच्या सतर्कतेमुळे आग भडकण्यापूर्वीच इमारत रिकामी झाली होती. आगीचा धूर संपूर्ण इमारतीत पसरला होता. या धुरामुळे पाच मजल्यावर एक कर्मचारी अडकल्याचे मुंबई अग्निशमन दलाच्या लक्षात येतात त्याला तात्काळ सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. दुपारी साडेबारा वाजता लागलेली आग १२ वाजून ४२ मिनिटांनी लेव्हल २ ची झाली. १२,५० लेव्हल तीन झाली. आग भडकत गेल्या १ वाजून १४ मिनिटांनी आग लेव्हल ४ ची झाली. अग्निशमन दलाच्या १६ फायर इंजिनसह १२० जवान घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम सुरु केले. इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु असल्याने इमारतीच्या चारही बाजूला लाकडी बांबूंचे परात उभी करण्यात आली होती शिवाय हवाही असल्याने आग अधिक भडकली. त्यामुळे परातही पेट घेऊन खाली कोसळले. सव्वादोनच्या दरम्यान आग आटोक्यात येत असतानाच अचानक आग पुन्हा भडकली. नवव्या मजल्यावर लागलेली आग आठव्या व १० व्या मजल्यापर्यंत पसरली. आगीच्या भडकलेल्या ज्वालांनी आठ, नऊ ते दहा हे तीन्हीही मजले वेढले गेले. प्रचंड धुराच्या लोळामुळे अग्निशमन दलाच्या शेवटच्या मजल्यापर्यंच पोहचता कठीण झाले. त्यामुळे हायड्रोलिक शिडीव्दारे इमारतीत पाण्याच्या फवा-य़ाचा मारा करण्यात आला. तीन वाजून २० मिनिटांनी म्हणजे जवळपास तीन तासांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात दलाला यश आले. आगीत महत्वाची कागदपत्रे जळाली असली तरी त्याचा डाटा सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.
तिरंगा सुरक्षित उतरवला --
आग लागल्यानंतर संपूर्ण स्टाफ जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली. याचवेळी तळमजल्यावर असलेल्या शिपाई कुणाल जाधव यांच्या १० व्या मजल्यावर तिरंगा झेंडा असल्याचे लक्षात आले. या मजल्यावर आग पसरत असतानाच त्यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ तेथे धाव घेऊन हा झेंडा वाचवला. झेंडा उतरवून जाधव सुखरुप इमारतीच्या बाहेर पडले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले जाते आहे.
आगीची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी -
जीएसटी भवनला लागलेली आग भीषण होती. त्या मजल्याला आग लागली तेथे आयुक्तांचे कार्यालय होते. येथे महत्वाच्या फायली होत्या त्या आगीत जळाल्या असाव्यात. आग लावली की लागली याची एसआयटीमार्फत चौकशी व्हायला हवी. जीएसटी कमी जमा होत असल्याने काही लोकांची चौकशी सुरु होती. इमारतीतला १० वा मजला अनधिकृत आहे का याची माहिती घेत आहोत, असे पालिका प्रशासन सांगत आहे. अनधिकृत बांधकाम केले जात असताना महापालिकेला माहिती नव्हती का, याचा खुलासा करावा.
रवी राजा, पालिका विरोधी पक्षनेते
आगीची चौकशी केली जाणार --
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आग लागल्याची माहिती कळताच यशवंतराव चव्हाण येथे सुरु असलेली महत्वाची बैठक सोडून ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करुन आढावा घेतला. आग कशी लागली, त्यात किती नुकसान झाले, कोणती कागदपत्रे जळाली याची चौकशी केली जाईल.
अजित पवार, उपमुख्यमंत्री
जीएसटी इमारत खूप जुनी आहे. या इमारतीचे दुरुस्तीचे काम पहिल्यांदाच होताना दिसते आहे. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले की नाही, हे माहिती नाही. आगीची चौकशी केली जाईल.
यामिनी जाधव, स्थानिक आमदार
इमारतींची पुन्हा तपासणी करणार -
इमारतीत दुरुस्तीचे काम सुरु होते. अग्निरोधक यंत्रणा कार्यरत होती. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार काम सुरु होते. यंत्रणा कार्यान्वित असल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. अग्नि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इमारतींच्या तपासण्या पुन्हा सुरु केल्या जातील.
- प्रवीण परदेशी, महापालिका आयुक्त